एक हाथ मदतीचा आपल्या पोशिंदा शेतकऱ्यासाठी.

‘मी शेतकरी’

               आपला भारत देश हा एक कृषिप्रधान देश आहे.या देशातील बहुतांश लोक हे गावात राहतात आणि शेती करतात. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवरच अवलंबून आहे. गावातील शेतकरी दिन – रात मेहनत करून शेतीची कामे करतो, पिके उगवतो आणि संपूर्ण मानवतेचे पोषण करतात. म्हणून या शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा मानला जातो.

               सध्याच्या परिस्थितीमध्ये हाच बळीराजा संकटांमध्ये आहे शेती हा व्यवसाय निसर्गाने साथ दिली तरच व्यवस्थितपणे करता येतो निसर्गाचा असमतोलपणा गारपीट दुष्काळ इत्यादी समस्या ने आजचा शेतकरी ग्रासलेला आहे.शेतकऱ्याला ना थंडी ची पर्वा न उन्हाची चिंता. कोणत्याही परिस्थितीमध्ये तो शेतीचे काम करणे सोडत नाही,आज आपण त्यास अन्नदाता म्हटले तरी वावगे ठरणार नाही कारण त्यांनी आपले कार्य थांबविले तर विचार करा मित्रांनो आपण खाणार काय? म्हणून माझे शेतकरी मित्र श्री. विवेकजी महाजन यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नतून शेतकर्‍यांना साथ देण्यासाठी मी पुढे सरकावलो जेणेकरून शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळावा आणि ग्राहकालाही ताजे फळे व पालेभाज्या आपल्या घरापर्यंत पोहचवण्यास आपण सवे प्रयत्नशिल राहू हाच आमचा प्रयत्न.

 

अमित गोरखे
आधारस्तंभ

           लोकहो, आपला महाराष्ट्र श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, व क्रांतीवीर लहुजी साळवेंचा, या पावन भूमी मधला मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे. मी या भूमीचा पुत्र आहे. ही माती माझी आई आहे. वर्षानुवर्षे शेतात खपून, घाम गाळून मी धान्य पिकवतो. मी तुम्हां सर्वांचा नम्र सेवक आहे. दिवस रात्र शेतात राबणारा शेतकरी प्रेमाने, मनापासून संपूर्ण बळ एकवटून पिक घेतो. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी ही निसर्गनिर्मित संकटे त्याच्यापुढे कायम आ वासून उभे राहतात तरी आम्ही शेतकरी डगमगत नाही आम्ही सह्याद्रीप्रमाणे कणखर उभे असतो, या संकटावर मात करून आम्ही मायेने लावलेले, जपलेले पिक घेतो पण अजून आमची परीक्षा संपलेली नसते. शाळेत शिकणाऱ्या मुलाला देखिल वर्षात फक्त दोनदाच परीक्षेला सामोरे जावे लागते पण आम्हाला प्रत्येक क्षणाला परीक्षेला सामोरे जावे लागते.

             एक समस्या सुटली कि दुसरी आमच्या समोर आ वासून उभी असते. आमच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळत नाही आणि जिथे भाव मिळतो तिथे दलाल आणि व्यापारी आमच्या कष्टाची कवडीमोल किंमत देत नाही या अवस्थेत आम्ही शेतकरी काय करणार? .हे कुठे तरी थांबल पाहिजे म्हणून आम्ही “मी शेतकरी” नावाने हे ओनलाईन अप्लिकेशन तयार केले आणि याचा फायदा फक्त शेतकऱ्यांनाच नाही तर ग्राहकाला पण होणार, तेही योग्य भावात .

         ‘जय जवान, जय किसान’ ही घोषणा सार्थ होण्यासाठी योग्य असे जीवन आम्हा सामान्य शेतकऱ्यांना लाभू दया, एवढीच आमची मागणी आहे.”

 

विवेक महाजन
संस्थापक